गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायतच्या आवारामध्ये घरकुलाच्या प्रतीक्षा यादी मध्ये वाढीव प्रपत्र ड साठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतीक्षा यादी मध्ये जिल्हास्तरावरून लाभार्थ्यांची नावे कमी झाल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर कमी झालेल्या नावान बद्दल चर्चा करणे आणि नमुना प्रपत्र ड मध्ये काही नवीन नावांची सर्वानुमते नोंद घेणे. यासाठी ग्रामसभा सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर ग्रामपंचायत मध्ये चर्चा चालू असताना ज्या गरजू लाभार्थ्यांची नावे प्रपत्र ड मध्ये आली नाहीत त्यांनी यावेळी त्यांच्या नावासाठी सरपंच व सचिव यांना विचारणा केली असता. सचिव यांनी सदरील नावे ऑनलाइन प्रणाली मध्ये टाकताना बाद झाली असावीत असे सांगितले. त्यामुळे प्रतिक्षा यादी ड मधील घरकुल लाभार्थी असताना सुद्धा त्यांची नावे यादीत आली नाही यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले होते. व ग्रामस्थ आक्रमक झाले होते यामुळे ग्रामसभेमध्ये गोंधळ निर्माण झाला आसता जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस शिपाई योगेश निंबोळकार, शेख इरफान, यांनी गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना शांत केले. तसेच सचिव धोटे यांनी शासन स्तरावर ज्या लोकांची यादीत नावे नाहीत ती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. जी नावे बाद झालेत ती समाविष्ट करण्यासाठी यावेळी त्यांनी पाठपुरावा केला. यावेळी ग्रामसभेला पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, अशोक काळपांडे गुणवंतराव कपले पांडुरंग गवई,पत्रकार गजानन सोनटक्के, शिवदास सोनोने, अनिल भगत, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,राहुल इंगळे,गजानन दातीर, यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व गावातील दीडशे च्या वर नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.