अंदाजपत्रकानुसार न बांधकाम केलेल्या पुलाच्या तक्रारकर्त्यांचे उद्यापासून आमरण उपोषण
गजानन सोनटक्के।
जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ने वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाल्यावर पूलाचे बांधकाम हे अंदाजपत्रका नुसार केलेले नाही व निकृष्ट दर्जाचे केलेले आहे अशी तक्रार सूनगाव येथील विजय वंडाळे व गजानन धुळे यांनी ग्रामपंचायतीला दिलेली आहे व 14 फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे परंतु गटविकास अधिकारी यांनी एक ते दीड महिना उलटून गेल्या नंतरही कोणत्याच प्रकारची चौकशी केलेली नाही व 28 3 2023 रोजी या पुलाच्या चौकशीसाठी गटविकास अधिकारी यांचेकडून एक समिती गठीत करण्यात आले त्यामध्ये बांधकाम शाखा अभियंता घिवे विस्तार अधिकारी मोरे विस्तार अधिकारी टाकळकर अशी चौकशी समिती गठीत केली होती परंतु या समितीने आतापर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे 23 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार उपोषण इशारा दिला होता त्यानुसार उद्या 5 4 2023 पासून सुनगाव येथील नागरिक विजय शत्रुघ्न वंडाळे व गजानन मारोती धुळे हे जळगाव जामोद पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणार आहेत