स्मशानभूमीची झालेली दुरावस्था बघता गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे यांनी दिले निवेदन…
गजानन सोनटक्के
सुनगांव प्रतिनिधी:-
गावातील सर्वसामान्य नागरिक असलेले सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर विनोद इंगळे यांनी गावातील स्मशानभूमीची झालेली दुरावस्था बघता ग्रामपंचात प्रशासनाला स्मशानभूमीची दुरुस्ती त्या ठिकाणी पोहोच रस्ता तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात यावे. मागील पंचवार्षिक पासून सुनगाव गावात पाच स्मशानभूमीना कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. टिन पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे यावर्षी पाऊस सतत चालु राहल्याने अंत्यसंस्काराच्या वेळेस लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे तरीसुद्धा गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तरी संबंधित ग्रामपंचायत ने वेळीच स्मशानभूमीची दुरुस्ती करून द्यावी अशा आशयाचे निवेदन गावातील विनोद इंगळे या तरुणाने आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत प्रशासनात दिले. तसेच गावातील नागरिकांमध्ये चर्चा आहे की सदर स्मशानभूमीचा दुरुस्तीसाठी आलेला निधी न वापरता तो गळप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे.