तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न
गजानन सोनटक्के जळगाव जा
तेली पंच मंडळ जळगाव जामोद ,च्या वतीने तालुक्यातील चौथा ,सातवा, दहावी ,बारावी तसेच उच्च शिक्षणात विशेष प्राविण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय विद्यालय येथे घेण्यात आला.
या सत्कार समारंभा चे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अजय डवले बुलढाणा तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे नायब तहसीलदार अंगद आसटकार, जळगाव खानदेशच्या नायब तहसीलदार प्राजक्ता आसटकार, अकोला येथील ओरल सर्जन डॉक्टर तुषार रोठे व पंचमंडळाचे अध्यक्ष रमेश जामोद उपस्थित होते. जवळपास 50 च्या वर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, फाईल व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच दहावी, बारावीतील समाजातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना संजय चोपडे यांचेकडून स्मृतीचिन्ह भेट स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी कुमारी प्रियंका जुमळे यांची एक लाख रुपये व मोबाईल असणारी बॕग श्रीकृष्ण भिकाजी जुमळे राहणार सुळे यांनी परत केल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम पांडव, रमेश आकोटकार ,नंदकिशोर काथोटे , अनिल भगत, प्रदिप भागवत, संजय चोपडे ,सुनील डवले व ईतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.