सुनगाव येथे खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न
Related Posts
गजानन सोनटक्के जळगाव जा
- कृषी विभाग जळगाव जामोद यांनी शेतकऱ्यांकरिता खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण दिनांक तीन जून रोजी। आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, प्रमुख मार्गदर्शक संजय उमाळे तसेच शशांक दाते कृषी सहायक ढाकुलकर मॅडम,तालुका आत्मा समन्वयक राऊत तसेच सूनगाव येथील कृषी मित्र मोहनसिंह राजपूत प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त वाकोडे यांनी कृषी विभाग मार्फत कपाशी गुणवत्ता पूर्ण लागवड प्रकल्प आणि कृषी विभाग यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. संजय उमाळे यांनी कपाशी उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी अवलंब याचे पंच सूत्रांची कमी खर्चाची माहिती शेतकऱ्यांना दिली यात प्रामुख्याने कीड नियंत्रण, तन नियंत्रण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी मागदर्शन यांना शंका विचारून त्याचे संपूर्ण समाधान केले आणि येणाऱ्या खरीप पिकांचे नियोजन सांगितलेल्या पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ढाकुलकर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन मोहनसिंह राजपूत यांनी केले तसेच परिसरातील शेतकरी बहु संख्येने उपस्थित होते.