गजानन सोनटक्के
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी संतोष राठी यांच्या शेतशिवारातील विहिरीमध्ये त्यांच्या शेतात कामाला असलेला शेतमजूर नामे तेरसिंग मनुसिंग गोचऱ्या याचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर मृतक इसम हा संतोष राठी यांच्या शेतामध्ये आपल्या छोट्याशा कुटुंबासह राहत होता तो संतोष राठी यांच्या शेतातच शेतमजुरी करीत होता.
आज सकाळी दिलीप राठी शेतामध्ये चक्कर मारण्याकरिता आले असता त्या ठिकाणी मृतक तेरसिंग गोचऱ्या हा त्याच्या कुटुंबासह शेतात मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतात फिरून पाहणी केली असता तो मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतामधील विहिरीला किती पाणी आहे हे पाहण्याकरिता विहिरीत डोकावले असता त्यांना काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसले त्यांनी निरीक्षण केले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. त्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहताच दिलीप राठी ही दुसरीकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता तीर सिंग कहा पे है और उसकी लाडी और बच्चे कहा पे है असे बोलले असता मृतक तेरसिंग ची पत्नी गीता ही आपल्या नातेवाईकांसह संतोष राठी यांच्या शेतात गेले असता त्यांनी व्हेरी डोकावून पाहिले असता त्यांना मृतक तेरसिंग याचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले व तो तेरसिंग ही है असे बोलले असता तसेच तेरसिंग याची पत्नी गीता हिने जळगाव पोलीस स्टेशन गाठले व पती विहिरीत पडल्याची फिर्याद दिली फिर्यादीच्या रिपोर्ट वरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने मर्ग दाखल करून घेतला मर्ग नंबर ५४/२०२१ कलम 174 नुसार दाखल करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ए एस आय शेषराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल गवई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदर मृतकाचे प्रेत जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनास पाठविले. सदर मृतक तेरसिंग गोचऱ्या याने आत्महत्या केली की काही त्याच्यासोबत घातपात झाला असा संशय येत आहे. पुढील तपास बिट जमदार अशोक वावगे करित आहेत