विद्युत पुरवठा नियमित मिळण्यासाठी सुनगाव ग्रामस्थांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता जळगाव जामोद यांना निवेदन
विद्युत पुरवठा नियमित मिळण्यासाठी सुनगाव ग्रामस्थांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता जळगाव जामोद यांना निवेदन
वायरमन व लाईन मन यांचा दुर्लक्षीतपणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगांव जामोद दि 7: सुनगाव गावातील विद्युत पुरवठा हा नियमित मिळण्यासाठी सूनगाव ग्रामस्थांच्यावतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले की सुनगाव येथे गेल्या वीस दिवसापासून अनियमितपणे वीजपुरवठा होत आहे दर तासाला दोन ते तीन वेळा वीज ये जा करते या कारणास्तव या वेळेत सार्वजनिक पाणीपुरवठा आल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाला अडचण निर्माण होते शिवाय सध्या पावसाचे दिवस चालू असल्यामुळे लहान बालकांना मच्छरापासून संसर्गजन्य रोग होऊ शकतो त्यामुळे सूनगावचा विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा हा वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत असतो उन्हाळ्यात ट्रिक कटिंग व्यवस्थित रित्या झालेली नसल्यामुळे सदर विषयाची शहानिशा करावी तसेच सुनगाव येथील वायरमन लाईनमन यांनी सुद्धा वेळोवेळी विद्युत पुरवठा का खंडित होतो व स्थानिक वायरमन लाईन मन यांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे निवेदनात नमूद केलेले आहे या निवेदनावर सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार, मोहनसिंह राजपूत, अमोल एडाखे ,किशोर धुळे, श्रीराम मिसाळ, गणेश दातीर ,बळीराम धुळे ,गणेश भड, संदीप बोबडे, अमोल येऊल,सुनील भगत, दीपक आकोटकर, नंदकिशोर काळपांडे सलीम तळवी इत्यादी नागरिकांच्या यावर सह्या आहेत