गजानन सोनटक्के
जळगाव जामोद दि22; तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत उसरा येथे अंगावर भिंत पडून सहा वर्षीय चिमुकली सोनाक्षी रमेश वानखडे हिचा दुःखदायक मृत्यू झाल्याची घटना 21 एप्रिल रोजी घडली आहे सोनाक्षीचे आई-वडील रमेश भगवान वानखडे रा. टूनकी कामानिमित्त उसरा येथे शेतीकामानिमित्त गेल्या पंधरा दिवसापासून आनंद आगरकर यांचेकडे आले होते व शेतात कामासाठी गेले असताना ती आपल्या मोठ्या भावंडांसोबत घरी असताना जोरदार वारा सुटल्याने तिच्या घराची भिंत अंगावर पडली व त्यामुळे ती गंभीर स्वरूपात जखमी झाली सोनाक्षीच्या मामाआनंद आगरकर यांनी तिला ग्रामीण रुग्णालय जळगाव येथे नेले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले तिच्या आशा मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे आज दिनांक 22 एप्रिल रोजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील यांच्याच गावातील ही घटना आहे त्यामुळे त्यांनी त्या पडलेल्या भिंती च्या ठिकाणी भेट देऊन मुलीच्या कुटुंबांचे सांत्वन केले