प्रतिनिधी रवींद्र सुरुशे मेहकर बुलढाणा – मेहकर शहरातील समता नगर परिसरात काल रात्री नऊ वाजे दरम्यान मनोरुग्न मुलानेच रागाच्या भरात कुरहाडी ने वार करून वडिलांचा खून केल्याची घटना घडली .
या बाबत मेहकर पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील समता नगर मध्ये रहात असलेले गजानन संपत गवई (वय ५३) हे जिल्ह्यातील अमडापूर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. गजानन गवई यांच्या घरात नवरा, बायको व २१ वर्षीय मुलगा शुभम राहतात. शुभम हा औरंगाबाद येथे इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षात आहे.
काल दि.२९ च्या रात्री गजानन गवई हे आराम करीत असताना शुभमने रागाच्या भरात कु-हाडीचे वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जातो म्हणून तो घरातून बाहेर पडला. शेजारच्या मंडळींनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोढे ,उमेश घुगे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शुभमशी त्यांनी संपर्क केला असता तो पोलीस स्टेशन जवळच होता. नंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुभम हा मानसिक रूग्ण आहे .त्याच्यावर उपचार सुरू होते.
आई वडिलांनी अभ्यास कर,मोबाईल कमी बघ असे म्हटले की शुभम चिडचिड करायचा काल रात्री ही तसेच झाल शुभम ला वडील गजानन गवई यांनी अभ्यास कर मोबाइल खेळु नको म्हणून हटकले असता त्याचा राग मनात धरून शुभम ने जन्मदात्या वडिलांचा खून केला. गजानन गवई यांना शुभम हा मुलगा, पत्नी, व चार मुली असून त्या चारही मुली विवाहित आहेत.मेहकर पोलिसांनी शुभम ला अटक केली असून हत्या करतांना वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली असून,फिर्यदि सौ.आशाबाई गजानन गवई यांच्या तक्रारी वरुन अप.क्र.२७६/२०२१कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विजय घुले करतआहे.