त्या लाचखोर आर एफ ओ कटारिया ची तुरुंगात रवानगी
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद वनपरिक्षेत्रा चे आर एफ ओ बी डी कटारिया 25 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने 13 मे रोजी रंगेहात अटक केली होती आरोपीला 14 मे रोजी खामगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे जळगाव जामोद वन विभागाच्या वतीने लाकडाची अवैध वाहतूक करणारे एक मालवाहू वाहन पकडले होते या प्रकरणात तडजोड करण्यासाठी लाकूड वाहन मालकाला 19 हजाराची लाच व सहा हजाराचा दंड असे एकूण 25 हजाराची मागणी करण्यात आली होती संबंधिताने याची तक्रार केल्यानंतर 13 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने सापळा रचून कटारिया यास 25 हजारांची लाच स्वीकारताना त्यांच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले होते या प्रकरणी कटारिया विरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कटारिया ला 14 मे रोजी खामगाव न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे आरोपी कटारिया हा अकोट येथील रहिवासी असल्याने घर झडतीची जबाबदारी अकोला एसीबीला देण्यात आली आहे
Related Posts