सुनगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान कडून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सूनगाव वार्ड नंबर चार मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अति प्राचीन असून या मंदिराचा जिर्णोद्धार 2014 साली येथील विश्वस्त मंडळ व गावकऱ्यांनी केला होता व नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी 2014 महाप्रसादाचे आयोजन ठेवण्यात आले होते तेव्हापासून नित्य क्रमाने दरवर्षी वैशाख मासारंभ द्वितीयाला या महाप्रसादाचे आयोजन संस्थांकडून केल्या जाते मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे दोन ते तीन वर्ष हा कार्यक्रम रद्द ठेवण्यात आला होता परंतु पुन्हा नव्या उमेदीने दिनांक 20 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता संस्थांच्या परिसरात ह भ प वैष्णवी ताई अकोट यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या किर्तनाचा महिला पुरुषांनी लाभ घेतला व त्यानंतर दिनांक 21 एप्रिल रोजी वैशाख मासारंभ द्वितीया च्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले होते पुरुष मंडळींनी दिवसभर नियोजनाचे
व डाळ शिजवण्याचे काम केले होते व गावातील महिलांना पोळ्या करण्यासाठी घरोघरी पिठाचे वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमास गावकरी व विश्वस्त मंडळ यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला व कार्यक्रमासाठी स्वैच्छेने भाविकांनी देणगी दिली होती स्वयंपाक झाल्या नंतर संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे आयोजन सात ते जवळपास 11 वाजेपर्यंत मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण झाले हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्त व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले
Related Posts