सुनगाव येथील प्रांजलीचे कौतुकास्पद यश
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजली लक्ष्मण मिसाळ हिने फेब्रुवारी 2021 मध्ये दहाव्या वर्गाची माध्यमिक शालांत परीक्षेची परीक्षा दिली होती त्यामध्ये तिने आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करीत मराठी विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले सुनगाव येथील एका साधारण कुटुंबातून असलेली विद्यार्थिनी आहे पण तिचा अभ्यासू स्वभाव यामुळे तिने मराठी या विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण घेऊन बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे त्यामुळे तिला अमरावती शैक्षणिक मंडळ यांनी एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले याचे श्रेय ती आपल्या आई-वडिलांना व शिक्षकांना देत आहे त्याबद्दल काल दिनांक आठ एप्रिल रोजी सुनगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी सुनगाव ग्रामपंचायतचे सरपंच रामेश्वर अंबडकार येथील ज्येष्ठ नागरिक गुणवंतराव कपले ग्रामपंचायत सदस्य योगिताताई कुरवाडे रमेश वंडाळे रमेश गवई समाधान काळपांडे बळीराम धुळे राजेश पाटील ऋषिकेश मिसाळ राजकुमार भड पांडुरंग इंगळे राजकुमार येऊल श्रावण धुरडे उमेश कुरवाडे सुनिता भड राजू अस्वार प्रकाश धर्मे पांडुरंग अंबडकार हिरामण शिरसाट संतोष अंदुरकर गोविंदा केदार सुरेश कापरे इत्यादी गावकरी उपस्थित होते