कुरणाळ बु.सुकळी,तरोडा, गाडेगाव,शिवारातील चक्रिवादळाने पिकांचे नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या!प्रशांत डिक्कर
गजानन सोनटक्के
जळगाव जा (ता.प्र.)
तालुक्यातील कुरणाळ बु. कुरणगाळ खु. सुकळी, चावरा, ईरोला, तरोडा, गाडेगाव इत्यादी शिवारात ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ झाल्याने कपासी, सोयाबीन, मका, तुर, ज्वारी, सह ईतरपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तत्काळ कुरणगाळ बु. सह ईतरही शिवारात जाऊन पाहणी केली.
प्रशासनाने तत्काळ नुकसान झालेल्या शिवाराची पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी.अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांचेकडे नुकसानी संदर्भात फोनवर माहिती देतांना केली आहे. शेतकऱ्यांनी खचुन न जाता याकरीता शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी प्रयत्नशील आहे. यावेळी स्वाभिमानीचे विलास इंगळे, विशाल सावंत, सोपान आटोळे, मोहन फाळके, अर्जुन अवकाळे, विठ्ठल आटोले, जानराव पाटील, अशोक जळमकार विठ्ठल ठाकरे ,यांचे सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.