व्यसनमुक्त होण्यासाठी महापुरुषांचे विचार आत्मसात करा
डॉ.रामपाल महाराज.
गजानन सोनटक्के
जळगाव/ (ता.प्र.)
श्री संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.२६ मार्च रोजी सुनगाव येथे प्रबोधनकार डॉ. रामपाल महाराज यांचा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्यदिव्य किर्तणाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या संकल्पनेतून भ्रष्टाचार व व्यसनमुक्त मतदारसंघ करण्यासाठी व संत महापुरुषांचे विचार प्रत्येक माणसांपर्यंत पोहचावे यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावा गावात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा सपाटा सुरू केला आहे. श्री आवजिसिध्द महाराज सुनगाव नगरीत संत शिरोमणी श्री संत रुपलाल महाराज पुण्यतिथीनिमित्त किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी प्राथमिक शाळा प्रांगणात संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी डॉ.रामपाल महाराज व मान्यवरांचे हस्ते श्री संत रुपलाल महाराज व श्री आवजिसिध्द महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनगाव येथिल उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांनी डॉ रामपाल महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रबोधनातुन श्री संत रुपलाल महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकत संताचे विचार आत्मसात करा निश्चित माणसाचे जिवन बदलुन जाते, व्यसनापासून दूर रहा, स्वतंत्र उद्योग उभे करा, उद्योजक व्हा, माणसं ओळखायला शिका, शेतकरी शेतमजूरांसाठी अहोरात्र संघर्ष करणारे प्रशांत डिक्कर अशा माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा.निश्चितच आपल्या मतदारसंघात नवी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास डॉ. रामपाल महाराज यांनी प्रबोधनातुन बोलताना दिला. कार्यक्रमाच्या मध्यंतरी रामपाल महाराज यांनी प्रशांत डिक्कर यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. यावेळी डिक्कर यांनी बोलतांना सांगितले की मतदारसंघात वाढलेल्या व्यसन विकृतीला आळा घालण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आपण सपाटा सुरू केला आहे. आपल्या परिसरातील काही नेतेमंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी भाग पाडतायत. पंरतु हा मतदारसंघ भ्रष्टाचार व व्यसनमुक्त करण्यासाठी आपण पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावु, शेतकरी शेतमजुरांच्या चेहऱ्यावर हास्य व युवकांना स्वतंत्र उद्योग धंदे उभे करुन देण्यासाठी तुमची साथ मला हवी आहे.निश्चितच या प्रलंबित प्रश्नावर या भागात मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असे मत प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. रामपाल महाराज यांच्यासह हार्मोनियम वादक सुनील गाईनकर,तबलावादक रुपेश कुमार खेडकर, साथ-संगत प्रवीण वाघ , पवन कदम, सुखदेव चिंचोळकर तर सुत्रसंचालन सागर मोरखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन उज्वल पाटील चोपडे, तेजराव लोणे, योगेश मुरूख, शेख सिद्धू, समाधान धुर्डे, स्वप्निल भगत, शुभम कपले, देवानन जाधव, प्रफुल करागळे, शिवा पवार,सोनु मानकर, गजानन सोनटक्के, गणेश भड,गुणवंत अंबडकार, अनंता धुळे सुनील भगत, मनोहर वानखडे, दिनेश ढगे, कविता ढगे, विजय मानकर, तर प्रमुख अतिथी रमेश ताडे,तुकाराम काळपांडे ,यांच्यासह सहकारी, बहुसंख्य नागरिक व महिलांची उपस्थिती होती.