केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी अजय पलन व सचिवपदी गिरीश केला यांची सर्वानुमते निवड…
केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी अजय पलन व सचिवपदी गिरीश केला यांची सर्वानुमते निवड…
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर झाली असुन सर्वानुमते अध्यक्षपदी अजय पलन व सचिवपदी गिरीश केला यांची अविरोध निवड करण्यात आली.स्थानिक विजय मेडिसेल्स येथे जळगाव जामोद तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सभासदांच्या बैठकीचे आयोजन दिनांक १२ मार्च रोजी करण्यात आले होते.यावेळी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी संजय वंडाळे व राजेश काळे यांच्या मार्गदर्शनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी अजय पलन व सचिवपदी गिरीश केला यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारी सदस्य(EC) म्हणुन जळगाव जामोद तालुका शहरा करिता तुषार पाटील व ग्रामीण करिता प्रवीण टिकार यांची निवड करण्यात आली.जळगाव जामोद तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सल्लागार म्हणुन दिपक उनडकाट, नारायण पाटील, रमेश काळपांडे, सुनिल भैय्या, मनोज बाणाईत, प्रकाश जाधव, संजय वंडाळे. तसेच उपाध्यक्षपदी दिपक देशमुख व शेख रहेमान शेख कासम, कोषाध्यक्ष म्हणुन संदेश डागा, सहसचिवपदी संतोष चांडक व वृषभ चांडक यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणुन मनोज वानखडे, मनोज दाभाडे, प्रमोद अंबडकार, गोपाल बडेरे, वैभव वानखडे, शेख नावेद शेख आसिफ, गोपाल ठाकरे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष अजय पलन यांनी सर्वांचे आभार मानले.