माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन… मातोश्री नथियाबाई विद्यालयाने वाहिली देवीसिंह शेखावत यांना श्रध्दांजली…
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन… मातोश्री नथियाबाई विद्यालयाने वाहिली देवीसिंह शेखावत यांना श्रध्दांजली…
गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष तसेच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. देवीसिंह शेखावत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आज वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पुणे येथे होणार आहे. देवीसिंह शेखावत यांनी अमरावतीचे महापौर पद सुद्धा भूषविले आहे. तसेच ते शिक्षणतज्ञ व कृषीतज्ञ ही होते. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव सारख्या अति दुर्लक्षित गावामध्ये त्याकाळी स्वर्गवासी डोंगरसिंहजी राजपूत यांच्या आग्रहाखातिर विद्यार्थ्यांचे जीवनमानांन उंचवावे करिता सुनगाव येथे मातोश्री नथियाबाई विद्यालयाची स्थापना केली. आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी त्यांना मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंदांनी देवीसिंह शेखावत यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे, शिवदास सोळंके, फोलाने सर,घोटेकर मँडम,राजपूत मँडम,धुर्डे सर,धुळे सर,रामेश्वर कुनगाडे, विशाल वसुलकार,हागे मँडम,पत्रकार अनिल भगत, गजानन सोनटक्के यांच्यासह विद्यालयाचे सर्व विद्यार्थी या श्रद्धांजलीपर कार्यक्रमास उपस्थित होते..