महादेव मढी संस्थान येथे शिवपुराण कथेचे आयोजन
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे असणाऱ्या महादेव मढी संस्थान येथे तीनशे वर्षापूर्वीचे शिवमंदिर व मोठी दगडांनी बांधलेली पाय विहीर आहे येथील विश्वस्त मंडळ यांनी दिनांक 13 2 2023 पासून संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन केले आहे या कथेचे वाचन कथाकार ह भ प संजीवनी ताई ढगे वडोदा यांच्या अमृततुल्य वाणीतून शिव महापुराण कथा वाचन होत आहे व येथील मंडळाच्या वतीने दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा आरती दुपारी एक ते पाच शिवमहापुराण कथा सायंकाळी हरिपाठ व रात्री श्रीहरी कीर्तनाचे आयोजन केलेले आहे तरी या शिव महा पुराण कथेचे सुनगाव येथील व पंचक्रोशीतील भाविक भक्त लाभ घेत आहेत या कथेसाठी तबला वादक तुषार महाराज वाडी माळुंगी गायनाचार्य श्याम महाराज माळेगाव पिपरी वादक समाधान महाराज वावगे पोटळी यांचे सहकार्य लाभले आहे संगीतमय व आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडत आहे तरी अशा या कार्यक्रमाची सांगता ही 20 3 2023 रोजी सोमवार ला होणार आहे तरी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मढी संस्थान येथील विश्वस्त मंडळाने केला आहे