गजानन सोनटक्के जळगाव जामोद
सूनगाव मधील वॉर्ड 1 मधील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊनही वॉर्ड नंबर 1 मधील ग्रामपंचायत समोरील रस्ता बांधकामाबाबत ग्रामपंचायत ला येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावर कोणतीच दखल घेतली नाही या रोडची अवस्था ही फार बिकट झाली आहे सांडपाण्याच्या नाल्या ची व्यवस्था येथे केलेली दिसत नाही व पावसाचे पाणी या रोडवर साचत आहे हा रस्ता अर्ध्यावरच कॉंक्रिटीकरण केलेला आहे व त्यावर सुद्धा पावसाचे पाणी साचलेले आहे

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी उतरून घरात साचत आहे अशीच परिस्थिती वॉर्ड नंबर एक मधील धावळे यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे व त्यांनी ग्रामपंचायत ला वेळोवेळी सांगून सुद्धा कोणत्याच प्रकारची सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही तरी ग्रामपंचायत ही जाणीवपूर्वक वार्ड नंबर 1 मध्ये दुर्लक्ष करीत आहे असा येथील नागरिकांचा आरोप आहे व ग्रामपंचायत प्रशासनाने येथील सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची नाली बांधकाम करून व्यवस्था करावी व रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली