दिवाळीसाठी गरीबांना देण्यात येणाऱ्या १०० रूपयात किटचे त्वरित वाटप करण्यात यावे – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
दिवाळीसाठी गरीबांना देण्यात येणाऱ्या १०० रूपयात किटचे त्वरित वाटप करण्यात यावे – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
गजानन सोनटक्के जळगाव जा महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी गरीबांसाठी १ किलो तेल, १ किलो दाळ, १ किलो साखर, १ किलो रवा, अशी किट १०० रूपयात देण्यात येण्याचे जाहिर करण्यात आले होते. परंतु जळगाव जामोद तालुक्यात अद्यापहि या किट उपलब्ध झालेल्या नाहित आधीच अतिवृष्टिमुळे शेतकरी,शेतमजूर, हवालदिल झालेला असून आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. चालू महिण्यात रेशन धारकांना गव्हाचे वाटप सुद्धा बंद आहे. हि गरीबांसोबत विटंबना शासनाने बंद करून त्वरित संपूर्ण राशन व दिवाळी किटचे वाटप करण्यात यावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद यांनी आंदोलन करून तहसीलदार जळगाव जामोद मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. उद्या दिनांक २२/१०/२०२२ पर्यंत रेशनचा वाटप न झाल्यास दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयात आंदोलनचा ईशारा प्रसेनजीत पाटिल यांनी दिला . यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटिल, जिल्हा सरचिटणीस संदिप उगले, शहराध्यक्ष अजहर देशमुख,माजी नगरसेवक शेख जावेद,महादेव भालतड़क, संजय ढगे, आशिष वायझोडे, राजुसेठ पुनेवाला, शिव खुपसे, मोहसीन खान, संजय दंडे, संजय देशमुख, सतिष तायडे, रविंद्र बाठे,रोहित पवार, निजाम राज,संतोष वेरुळकार, मोहजिर मौलाना, सिद्धार्थ हेलोडे, भास्कर धूंदाळे आदि उपस्थित होते.