सिंदखेडराजा : फायर बंब असताना देखील शहरातील आगीच्या घटनांमध्ये होत असलेले नुकसान आपण टाळू शकत नाही,त्यामुळे येथील अग्निशमन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्य था पलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाच्या वतीने पालिकेला देण्यात आला आहे.शुक्रवारी मध्यरात्री येथील एका कृषी साहित्याच्या दुकानाला आग लागली या आगीत जवळपास 50 लाख रुपयांचा माल जाळून खाक झाला.खासगी टँकर आणि जालना येथील फायर बांब बोलावून आग आटोक्यात आणली गेली.
पालिकेकडे पाच वर्षांपासून फायर बंब आहे परंतु जागा बदलण्या पलीकडे या वाहनाचा कोणताच वापर झालेला नाही.याच संदर्भात भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांनी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून अग्निशमन सेवा तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.अग्निशमन वाहन कार्यान्वित असते तर जालना येथून वाहन बोलवावे लागले नसते आणि आगीत होणारे लाखो रुपयांचे नुकसान टाळता आले असते असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अग्निशमन वाहन ठेवण्यासाठी जी इमारत पालिकेच्या ताब्यात आहे ती विभागीय अधिकारी कार्यालयाला भाडे तत्वावर देण्यात आल्याने फायर बंब मोकळ्या मैदानात ठेवण्यात आला आहे पाच वर्षांपासून हे वाहन नादुरुस्त आहे तर दुसरीकडे यासाठी पुरेसा स्टाफ नाही.या सर्व बाबी तत्काळ पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष कृष्णा काळे, सभापती कैलास मेहेत्रे,सोहम जयभाये,युवराज नागरे,ओम भुसारे,रामेश्वर घतोळकर,गजानन भुतेकर,बाळासाहेब केळकर यांनी उपस्थिती होती.