गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधि -स्थानिक जळगाव जामोद शहरातील सुनगांव रोडवरील निळकंठेश्वर नगर मधील रहिवासी गोपाल वानखडे यांच्या घरासमोर एका स्त्री जातीचे नवजात अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये आणून टाकून निघून गेले.तेथीलच काही नागरिकांना आज दिनांक २८ आँगष्ट रोजी पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान ट्रालीमध्ये बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला.
त्यामुळे नागरिकांनी ट्रॉलीमध्ये जाऊन पाहिले असता स्त्री जातीचे जिवंत अर्भक दिसून आले येथील नागरिकांनी त्याच क्षणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती देताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक राजू बुटे हे घटनास्थळावर पोहोचले त्यांनी येथील नागरिकांच्या मदतीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत त्या नवजात जिवंत स्त्री अर्भकास ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.
सदर घटनेची फिर्याद अरुण तुकाराम खिरोडकार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध नंबर ७०५ कलम ३१७ भारतीय दंडविधान नुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य अधिकारी कर्मचारी तसेच गावकऱ्यांच्या मदतीने नवजात स्त्री अर्भकाचे प्राण वाचले. पोलीस व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या कार्य तत्परतेमुळे त्या नवजात स्त्री अर्भकाचे प्राण वाचल्यामुळे
जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक राजीव बुटे व आरोग्य अधिकारी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्या अर्भकास जळगाव जामोद पोलीसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे,योगेश निबोळकार,अनिल बुले हे करीत आहेत.