जळगाव जामोद गजानन सोनटक्के जळगाव जा – कोरोना काळानंतर प्रथमच शाळा सुरू झाल्यामुळे जळगाव जामोद शहरातील काही शाळेकडून प्रशासनाने दिलेले निर्देश डावलून नियमबाह्य संमती पत्र लिहून घेतले त्याला पालक संघटनेकडून विरोध करण्यात आला. सदर संमती पत्रात शाळेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याप्रती स्वतःची जबाबदारी झटकत संपूर्ण जबाबदारी पालकांवर टाकली. वास्तविक विद्यार्थी दिवसभर शाळेत असल्यामुळे शाळेची जबाबदारी जास्त आहे. विद्यार्थी कोविड नियम व सूचनांचे पालन करतील ही जबाबदारी पालकांची असताना नियमबाह्य संमती पत्र लिहून घेतल्याचा पालक संघटनेकडून विरोध करण्यात आला.
.शासनाच्या फी माफीला खाजगी शाळा प्रशासनाने पुसला हरताळ – कोरोणा काळामुळे महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी 15 टक्के फी माफी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित केल्या नंतर सुद्धा शाळेकडून टाळाटाळ होत आलेले दिसले. उलट फी जमा करण्यासंदर्भात तगादा लावण्यात आला. त्यामुळे पालक संघटनेने शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे 15 टक्के सवलत मिळावी याकरिता पालक संघटनेकडून निवेदन देण्यात आले.
कोरोना काळ व नैसर्गिक संकट यामुळे पालक वर्ग अडचणीत सापडल्यामुळे शाळेची फीमध्ये सवलत मिळून ती फी टप्प्याटप्प्याने वसूल करावी यासंदर्भात जळगाव जामोद शहरातील काही काही इंग्रजी शाळेला निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे ,उपाध्यक्ष अर्शद इकबाल, प्रशांत तायडे, सचिव अनिल भगत, विधी सल्लागार अमर पचपोर,प्रसिद्धी प्रमुख राजीव वाढे, अश्विन राजपुत, संघटक सर्व अजय पलन, राधेश्याम दाताळकर, श्याम पाटील, जितेश पलन उपस्थित होते.