लोणार,विष्णु आखरे पाटील – अंढेरा येथे २८आॕगस्ट रोजी सकाळी नऊ च्या दरम्यान शेतातील विहिरीवरील मोटारपंप चालू करण्यासाठी गेले असता विद्युत प्रवाह पेटीत उतरल्याने सदर शेतकऱ्यांचा मृत्यु झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती असे की; अंढेरा येथील मृतक शेतकरी नामे प्रभाकर कडुबा तेजनकर वय ५२ वर्षे यांची अंढेरा शिवारात गट नंबर ४१३ मध्ये स्वत:ची मालकीची जमीन असुन ते बराच दिवसांपासून शेतात राहत होते.
सकाळीच नेहमी प्रमाणे शेतात गेले सततच्या पावसाने विहिरींना मुबलक पाणी व शेत दलदल झाल्याने पिके हातची निघून नये म्हणून पाणी उपसून टाकण्यासाठी शेतातील विहिरीवरील मोटार पंप सुरु करण्यासाठी शेतात गेले असता अचानक विद्युत प्रवाह विहीरीवरील पेटीत उतरल्याने जबर धक्का लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मृतक यांच्या नातेवाईक यांनी दिली.मृतक हे अल्पभूधारक असुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे शेतीवरच चालवत होते निर्सगाच्या लहरी पणाने शेतकरी विविध प्रकारच्या हालाखीच्या परिस्थितीत कुटुंब यांचा उदर निर्वाह चालवत होते.त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार असुन त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर यांनी तात्काळ बिट जमदार पोहेकाॅ गजानन वाघ व पोशि एहसान सय्यद यांना घटनास्थळी पाठवले.पोलीसांनी पंचा समक्ष पंचनामा करून मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.व त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले पुढील तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ गजानन वाघ करीत आहे.