सिंदखेड राजा – दिनांक २९/०६/ २०२३ रोजी हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सन तसेच त्याच दिवशी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद उत्सव एकत्र असल्याने शहरामध्ये सलोख्याचे वातावरण राहावे तसेच आगामी उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मा. श्री. सुनील कडासने पोलीस अधिक्षक साहेब बुलडाणा, मा.श्री.बी.बी.महामुनी अप्पर पोलीस अधिक्षक साहेब बुलडाणा, मा.श्री. गुलाबराव वाघ उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब बुलडाणा प्रभार देउळगावराजा, यांचे सुचनेनुसार श्री केशव वाघ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांनी आवाहान केल्याप्रमाणे सिंदखेड राजा शहरातील श्री. अॅङ नाझेर काझी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष) यांचे नेतृत्वामध्ये मुस्लीम बांधवांची मिटींग घेण्यात आली व सदर मिटींग मध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाउ माँ साहेबांचे जन्मस्थान मातृतिर्थ सिंदखेड राजा ची ख्याती वैश्वीक आहे.
सामाजीक सलोख्याचे पालेमुळे या भुमीत खोलवर रुजलेले आहेत. आषाढी एकादशी आणी बकरी ईद उत्सव एकाच दिवशी येत असल्याने राष्ट्रीय एकात्मता व सामाजीक सलोखा कायम राहावा यासाठी बकरी ईद च्या दिवशी परंपरेने करण्यात येणारी कुर्बानी दिनांक २९/०६/२०२३ रोजी न करता दिनांक ३०/०६/२०२३ रोजी करण्याचा ऐतीहासीक निर्णय नगरीच्या समस्त मुस्लीम समाजाने घेतलेला आहे. सदर बैठकीला शहरातील मश्जिदचे इमाम, मौलवी, प्रतिष्ठीत नागरीक, कुरेशी समाजाचे सर्व प्रतिनीधी तसेच कुर्बानी करणारे बांधव आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
सिंदखेड राजा शहरामधील सलोखा कायम कौतुकास्पद राहीलेला आहे त्यामध्येच मुस्लीम बांधवानी घेतलेल्या निर्णयामुळे शहरामधील जनतेमध्ये !! हम साथ साथ है !! जणु अशा प्रकारचा एक संदेश मुस्लीम बांधवांनी दिला आहे.