संग्रामपुर [ प्रतिनिधी ] – कोरोनाच्या पाश्वभुमिवर लाकडाउन काळात सर्व सण उत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा घरात राहुन साजरे करण्यात आले लॉकडाऊन पासुन मुक्ती मिळाली शासनाने नियम काहि प्रमाणात शिथिल करुन बदल केले परंतु सार्वजनिक सन उत्सव एकत्र ऐऊन साजरे करण्यास मुभा नसल्याने मुसलीम समाज बांधवांनी ईद उल अज्हा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आव्हान तामगाव पो स्टेचे ठाणेदार भुषण गावंडे यांनी पातुर्डा पोलीस चौकी येथे ईद उल अज्हा निमित्त शांतता कमेटी मार्गदर्शन बैठक प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले कि पातुर्डा गाव संत महात्मा महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेले असल्याने सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात सण उत्सव साजरे करतात हि बाब कौतुकास्पद असुन सर्वदुर पर्यत पातुर्डा गावाची राष्ट्रीय एकात्मता व भाई चारा हि ओळख कायम ठेवण्याचे आव्हान ठाणेदार गावंडे यांनी केले यावेळी मदर्सा जियाउल उलुमचे अध्यक्ष मौलवी सैय्यद अफसर , नगिना मस्जिदचे अध्यक्ष शेख सुलतान , मौलवी शेख अफसर , मिरकुर्बान अली , हाफीज शेख अजहर , सलाम खा , हाफिज मो साबीर , शेखबशीर , ईलयाज खान , मौलाना शेख अब्दुल्ला , मौलाना शेख अन्सार , हाजी शेख जफरोद्दीन , सनाऊल्ला खान आदी मुसलीम समाज बांधव उपस्थित होते.