ऍट्रसिटीच्या एका गुन्ह्या मध्ये मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे डीवायएसपि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज २० मे रोजी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.सदर लाचेच्या मागणीची पडताळणी केल्या नंतर आज सापळा रचून पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे यास तक्रारदार यांच्याकडून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खार्डे,संतोष अंभोरे यांच्या विरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी मद्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या पथकाने दोन दिवस या तक्रारीची पडताळणी करून खात्री केली. त्यानंतर गुरूवारी (ता.२०) पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कदीम जालना पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे याला पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या आवारात दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तसेच संशयित उपविभागीय पोलिस अधीकारी सुधिर अशोक खिरडकर, पोलिस कर्मचारी विठ्ठल पुंजाराम खार्डे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधीकारी सुधीर खिरडकर याची चौकशी सुरू असून या प्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल झालेला नाही.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकातील पोलिस उपअधीक्षक वर्षांराणी पाटील, पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, कर्मचारी नवनाथ वाळके, दिनेश माने ,किरण चिमटे, यांनी केली.