
अतिक्रमित दुकानदारांना पाठविल्या नोटीस
प्रतिनिधी 12 नोव्हेंबर
दुसर बीड ता सिंदखेड राजा – सिंदखेड राजा मेहकर राज्य महामार्गावरील दुसर बीड येथील काही लोकांनी अतिक्रमण करून दुकाने थकली आहेत मुंबई वरून नागपूर जाण्यासाठी हाच महामार्ग शॉर्टकट असल्याने या मार्गावर रोज मोठ मोठाल्या शेकडो वाहनांची वर्दळ असते असे असताना या महामार्गावरील ठिकाणच्या मोठ्या गावात अतिक्रमण झाल्यामुळे या मार्गावर होणारे अपघात तसेच वाहतुकी स निर्माण होणारा अडथळा पाहता भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा जवळपास दोनशे ते अडीचशे अतिक्रमिक दुकानदारांना नोटीस बजावल्या आहेत स्वयंपूर्ण तिने अतिक्रमण काढून न घेतल्यास बुलडोजर चालविल्या जाईल असा इशारा राष्ट्रीय राज्य महामार्ग विभागाने दिला आहे याबाबत असे की भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण विभागाकडे येथील राज्य महामार्ग देखरेखीसाठी आहे नोटीस चा अनुषंगाने रस्त्याच्या माध्यमातून दोन्ही बाजू च्या 15 मीटर हद्दीतील टपरी शेड बांधकाम तसेच मुरूम भराव नोटीस मिळाल्याच्या सात दिवसात कोणता काढून घेण्याचे अतिक्रमणधारकांना बजावण्यात आले आहे लँड आणि ट्राफिक कायदा 2002 अन्वय कलम 11 नुसार जाय मोक्यावर अस्तित्वात असलेल्या मुद्देमाल जप्त करून सदर अतिक्रमण काढण्याकरिता झालेल्या संपूर्ण खर्चाची रक्कम संबंधित प्रतिष्ठान अथवा अतिक्रमण धारकाकडून वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही नोटीस द्वारे अतिक्रमणधारकांना देण्यात आला असल्याने ठिकाणी झालेल्या अतिक्रमण काढून महामार्ग मोकळा श्वास घेणार पण गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी सदर नोटिसा बजावण्यात आल्या असताना अद्याप पर्यंत भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग विभागाने काहीच कारवाई केली नसल्याने सदर अतिक्रमण काढणार की नाही असा प्रश्न संबंधित अतिक्रमणधारकांना पडला आहे तर अतिक्रमण कधी हटवल्या जाणार. याकडे वाहनधारक सह जनतेचे लक्ष लागले आहे
- – ‘ – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
दुसरबीड येथील अतिक्रमण धारकांना आमच्या विभागाने अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत परंतु मध्ये दिवाळी सण आल्याने थोडा उशीर झाला पण येत्या मंगळवारपासून सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे
सुरेश कजबे
इंजिनीयर भा रा राज्य महामार्ग औरंगाबाद