बुलडाणा दि.16 : मे. मनिष मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स, जांभरुण रोड, मुठठे लेआउट, बुलडाणा या ठिकाणी 12 जुलै रोजी अवैधरित्या गर्भपातासाठी वापर होत असलेल्या एमटीपी किट अवैध रित्या खरेदी करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. सदर माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गर्भपातासाठी लागणारी (Gestapro Kit) हे औषध बनावट ग्राहकाला विक्री केल्याचे आढळल्याने मे मनिष मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स, मुठ्ठे लेआउट , जांभरुण रोड, बुलडाणा व सदर दुकानात उपस्थीत अन्य एक व्यक्ती यांचेकडुन एकुण 5 किट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सदर दोन्ही आरोपीविरुध्द शहर पोलीस स्टेशन बुलडाणा येथे प्रथम खबर अहवाल नोंदविला आहे.
पुढील तपास पोलीस स्टेशन बुलडाणाहे करीत आहे. सदर कारवाई सह आयुक्त (ओषधे ) अमरावती विभाग यु बी. घरोटे यांचे मार्गदर्शनाखाली श्री बर्डे, सहायक आयुक्त, (औषधे ) व गजानन प्र. धिरके, औषध निरीक्षक यांनी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी इशारा दिला की, अवैधरित्या गर्भपाताची औषधे खरेदी अथवा विक्री करतांना कुणी आढळल्यास औषधे व सौदर्य प्रसाधने कायदयानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. स्त्री भूण हत्या हे समाजविघातक कार्य आहे. तरी जनतेनी आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या प्रिक्रीप्शनवर व डॉक्टरांच्या सल्याने सदर औषधीचा वापर करावा, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.