महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची फेररचना बुलढाणा जिल्यातील डॉ विशाल इंगोले लोणार यांची सदस्यपदी निवड
लोणार दि. २8; महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून अध्यक्ष व ३० सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त सदस्यांमद्ये बुलढाणा जिल्यातील डॉ विशाल इंगोले यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्ष व 30 सदस्य अशा एकूण 31 सदस्यांची दि. 05.03.2019 च्या शासन निर्णयान्वये तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्यांचा राजीनामा स्वीकृत झाला आहे. मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
या समितीत पुढील प्रमाणे सदस्यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित अध्यक्ष, डॉ.भिमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ.अरुण भोसले, श्री. राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, श्री. सतिश आळेकर, श्री. हेमंत राजोपाध्ये, श्री. सुबोध जावडेकर, श्री. आसाराम लोमटे, डॉ. रविंद्र रुक्मिणी रविंद्रनाथ, श्री. निखिलेश चित्रे,डॉ. प्रकाश पवार, श्रीमती शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे,श्रीमती प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी,डॉ. विशाल इंगोले डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार,श्रीमती मनिषा उगले,श्री. भाऊसाहेब चासकर,श्री. उल्हास पाटील.
डॉ.विशाल इंगळे यांची सदस्यपदी निवड झाल्यामुळे बुलढाणा जिल्यातून लेखणीचे फलित झाले अश्या प्रतिक्रिया येत आहे .
अशीच एक प्रतिक्रिया लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते यांनी व्यक्त केली ती डॉ.विशाल इंगळे यांच्याच कवितेतून
माझा हयातीचा दाखलाकार कविवर्य डॉ विशाल इंगोले यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या राज्य सदस्य पदी निवड.झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. डॉ तुझ्या लेखणीचे फलित झाले.तुझी एक कविता ह्या निमित्ताने
अतिक्रमण
त्या पिंपळवृक्षाखालचे
अतिक्रमण काढावे म्हणतो
बुद्धाला अन माणसाला
थेट जोडावे म्हणतो..
विचारांची भरली जत्रा
दुकानांची रेलचेल आहे
कैदेतुनी या फुले, शाहू,
आंबेडकर काढावे म्हणतो…
पुस्तकात वाचले अन्
भाषणात ऐकले छत्रपती
अनवाणी पायांनी ज़रा
चार गड चढावे म्हणतो..
जाळात विचारांच्या टाका
मेंदूत रुतलेली पंचांगे
धाकामधुनी देवाच्या आता
माणसाला काढावे म्हणतो…
मेंदू व्यापून आहे सारा
‘जात’ नावाचा व्हायरस
गाथेच्या ‘क्लीनिंग अँप ने
सारी जळमटे झाडावी म्हणतो…
मंत्रालयात आहे म्हणती
गळफास विनण्याचा चरखा
फासामधुनी या हे सारे
वावर काढावे म्हणतो…