आरोपाने डॉक्टरांनी निराश होऊ नये.रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील सय्यम पाळत डॉक्टरांचा सन्मान करावा-पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे
चिखली – शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊन न जाता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी केले आहे.
संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची देशात दुसरी लाट सुरू असून तज्ज्ञांच्या माहितीनुसार लवकरच तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची महत्वपूर्ण बैठक स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी खासगी हॉस्पिटलला व डॉक्टरांना येणाऱ्या अडीअडचणी पालकमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. डॉक्टरांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत डॉक्टर मंडळी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या या संकट काळात रुग्णसेवा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा योग्य तो सन्मान करावा असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी केले.
यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. तिसरी लाट ही लहान मुलांकरिता त्रासदायक ठरू शकते त्यामुळे बालरोगतज्ज्ञांनी यासाठी आपापले रुगणलाय सज्ज ठेवावे, त्यांच्यावर आवश्यक तो औषधोपचार करून योग्य प्रकारे त्यांचा उपचार होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना ना डॉ शिंगणे यांनी दिल्या.
यावेळी चिखलीतील सर्व कोविड सेटंरचे संचालक डॅा सुहास खेडेकर अध्यक्ष चिखली मेडिकल असोसिएशनचे,
डॅा सुहास तायडे अध्यक्ष आय एम ऐ चिखली, डॅा शिवशंकर खेडेकर सचिव आय एम ऐ चिखली, डॅा रामेश्वर दळवी, डॅा संतोष सावजी, डॅा भारत पानगोळे, डॅा पंढरी ईगंळे, डॅा कृष्णा खंडागळे, डॅा प्रियेश जैस्वाल, डॅा निलेश गोसावी, डॅा मंगेश मिसाळ, डॅा अजय अवचार, डॉ प्रकाश शिंगणे, डॉ सुशांत पाटील उपस्थित होते.