बुलढाणा – उपचाराविना कुठल्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये आणि अतिशय उच्च प्रतीचा औषध उपचार रुग्ण आहे त्याच ठिकाणी भेटावा या भावनेतून केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अथक प्रयत्नाने बुलढाणा जिल्हा ला सुसज्ज अशी फिरते आरोग्य मोबाईल युनिट मिळाले आहे सुसज्ज अशी रुग्णवाहिका आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाली असून या रुग्णवाहिकेचे राज्याचे अन्न औषध आणि प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्हाधिकारी एस राममूर्ती आणि बुलढाणा आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून या रुग्णवाहिका मध्ये असलेल्या सुविधांची माहिती करून घेतली आहे.
Related Posts