(प्रतिनिधी सचिन मांटे-)सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील वडील दिपक नागरे यांचे शिक्षण ७ वी वर्गापर्यंत आणि आई लता दिपक नागरे वर्ग २ रीपर्यंत या दाम्पत्याच्या ८ व ९ एकर शेती हा व्यवसाय करून आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर केले दोन्ही मुलांचे १० वी पर्यंत चे शिक्षण मराठी माध्यमातून खेड्या गावातून झाले.काही तरी जगावेगळा करून दाखवायचे अशी जिद्दच दोन्ही भावाच्या मनात जिद्द मनात होती आणि आहे. (मुलाची प्रतिक्रिया) आपले आई वडील शेतकरी म्हणून आपला काही होणार नाही असा विचार आला की एकदा आमच्या आई बाबांना नक्की च भेटा कारण त्यांचे शिक्षण नसताना त्यांनी आम्हा दोघा भावांना डॉक्टर केला… आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात तर काम केले च पण दुसऱ्यांच्या शेतात ,
कुणाच्या विहिरीवर, जे काम भेटेल ते करत गेले एकेकाळी आम्ही लहान असतांना त्यांनी घरोघरी जाऊन द्राक्षे सुधा विकली, मोठाले अधिकारी व पदाधिकारी वर्ग तरी सुट्ट्या घेत असेल पण माझ्या आई वडिलांनी आमच्या शिक्षणाकरिता कधी च सुटी घेतली नाही,त्यांचे एवढे परिश्रम बघून च आम्ही दोघे भाऊ म्हणजे मी डॉ.पवन लता दिपक नागरे (एमबीबीएस ; अमरावती) आणि दुसरा सुदर्शन लता दिपक नागरे ( एमबीबीएस ; चंद्रपूर) घडलो…परिस्थिती कशी ही असो आई वडील तिला शरण ना जाता तिच्या सोबत लढायला शिकवले..आम्ही जे काही आहे ते फक्त आई वडिलांनमुळेच