संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तुटवडा निर्माण झाला असताना एन पावसाळ्याच्या दिवसात खाजगी पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन करणार आहेत.लसीकरण, बिल्ला आधार नंबर ,पशुगणना यासारखे विविध काम पशुधन पर्यवेक्षक पाहत असतात. यांच्या कार्यामुळे पशुधन वरिष्ठ अधिकारी त्यांना कुठलाही त्रास होत नाही. परंतु ह्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पशुधन पर्यवेक्षक हे पद नाहीस करा.आणि संपूर्ण पशुवैद्यकीय दवाखान्यात वरिष्ठ अधिकारीच बसवा. ‘बोगस डॉक्टर’ असा कल्लंक ही लावा. असा त्याचा अजेंडा वरिष्ठ अधिकारी संघटना घेऊन फिरत आहे.ही संपूर्ण बाब पक्षपाती आहे.महिला महाविद्यालय मेहकर या ठिकाणी पशु चिकित्सा व्यवसायी संघटना व असंघटित खासगी पशुधन पर्यवेक्षक यांनी बैठक पार पडली .या बैठकीत विविध मागण्या मांडण्यात आल्या.त्यामध्ये 1984 च्या कायद्यात बदल करा.नवीन भरती प्रक्रिया सुरू करा. अशा काही प्रमुख मागण्या आहेत. अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. असंघटित खाजगी पशुधन पर्यवेक्षक संघटना यावेळी तयार करण्यात आली. १५ तारखेपासून पशुसेवा बंद करु. अशी शपथ सुद्धा देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष डॉ. वायाळ साहेब हे होते. तर डॉ. आर.ई सोनुने ,डॉ.प्रवीण निळे ,डॉ.विलायत उबरहंडे , डॉ.वानखेडे , डॉ.देशमुख ,डॉ.शिंगणे ,डॉ. विभुते इत्यादी डॉ.प्रामुख्याने उपस्थित होते.त्याच प्रमाणे तालुक्यातील विविध खाजगी पशुधन पर्यवेक्षक या बैठकीस उपस्थित होते.या मागण्या मान्य करण्यासाठी विविध निवेदन देण्यात येणार असून पशुपालक मात्र चिंतेत सापडणार आहे. १५ तारखेपासून खाजगी पशुधन पर्यवेक्षक फिरताना दिसला तर ५ हजार रुपये दंड आणि पोलीस कारवाही करण्यात येणार आहे.ही जबाबारी खाजगी पशुधन पर्यवेक्षक संघटना स्वतः करणार आहे.या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.पवार यांनी केले.यावेळी कोरोना प्रतिबंध सुद्धा पाळण्यात आले.
Related Posts