स्वाभिमानीच्या दणक्याने डोणगाव येथील घंटागाड्या सुरू ग्रामपंचायत प्रशासनाने बंद केल्या होत्या घंटागाड्या.
मेहकर रवींद्र सुरूशे – स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
तब्बल तीन तास घोषणाबाजी करत ग्रामपंचायत च्या पायावर आंदोलन चालू होते स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत विविध विकास कामावर निधी खर्च केल्याची चौकशी करण्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने डोणगाव ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांनी विकास कामाची चौकशी करून जोपर्यंत तक्रारदार हे माफी मागत नाहीत अशा प्रकारची भूमिका घेऊन डोणगाव शहरातून कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज 25 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने घंटागाड्या चालू करण्याची भूमिका घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले