Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आर्थिक वर्ष 2020/21 मधील न प फंडातून राखीव असलेला दिव्यांग व महिला बालकल्याण निधीचे वाटप लाभार्थ्यांना लवकरात लवकर करा – काँग्रेस नगरसेवकांची मागणी.

गजानन सोनटक्के जळगाव जा– दिनांक 14 जून 2019 रोजी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना जळगाव जामोद शहरातील दिव्यांग,तसेच गरजू आर्थिक दुर्बल महिला, विधवा व परित्यक्त्या महिला यांना मिळनारा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा या बाबतीत निवेदन देण्यात आले.

DIVYANG


लाभार्थ्यांना हा लाभ आर्थिक स्वरूपात किंवा रोजगाराभिमुख साधने देऊन देण्यात यावा.गरजू महिला व अपंग यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर राखीव निधीचे वाटप करावे अन्यथा प्रशासनाच्या विरोधात व लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आणी त्यापासून होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामास प्रशासन जबाबदार राहील.अशा प्रकारचे निवेदन न प गटनेते अर्जुन घोलप,नगरसेवक श्रीकृष्ण केदार ,ऍड संदीप मानकर यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.