अवैद्य दारूबंद करावी किनगावराजा पोलीस स्टेशन ला साठेगाव येथील महिलाचे निवेदन.
किनगावराजा (सचिन मांटे) -साठेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे अवैध दारू विक्री होत आहे . दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर पडले आहे. रोज पती-पत्नी यांचे दारूमुळे भांडणे होत असून आर्थिक ,सामाजिक, शारीरिक नुकसान होत आहे . तसेच सार्वजनिक ठिकाणी भांडणे होताहे अनुचित शब्दाचा वापर होतो.
त्यामुळे महिलांना लाज वाटेल अशी भाषा वापरतात तरी मौजे साठेगाव तालुका सिंदखेड राजा येथील अवैध दारू विक्री बंद करावी अशी विनंती गावचे सरपंचे अर्जुन नागरे, माजी सरपंच बद्री नागरे,माजी उपसरपंच अनंता घुगे,कारभारि नागरे,राजेंद्र नागरे, गणेश नागरे नंदा घुगे,विनोद नागरे,रवि जायभाये,महिला रेणुका नागरे,रंजना नागरे,संगीता नागरे,लता वनवे ,सुनीता नागरे, यांच्याद्वारे करण्यात आली ही विनंती मान्य पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन किनगाव राजा माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिंदखेड राजा यांना एका अर्जाद्वारे करण्यात आली.