सिद्धेश्वर जाधव -कोरोना काळात सर्वत्र आँनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्याची काही गरज पडली नाही.परंतु महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनकडून इतर जे शुल्क आहे, जसे जिमखाना फि,वाचनालयांची फी असे किती तरी शुल्क प्रवेशाच्यावेळी आकारले आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचा काडीमात्र उपभोग घेतलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून तंत्रशिक्षण मंत्रालयाने अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनची १६०००/- एवढे शिक्षणीक शुल्क माफ केले, कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सोडून सोडून सर्वाना ( Engineering ) शिक्षण शुल्कामध्ये सवलत देण्यात येत आहे . मग फक्त कृषी विद्यापीठानांच सवलत का नाही ? का हा अन्याय ? Engineering च्या विद्यार्थ्यांप्रमाणे कृषीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण शुल्कामध्ये कमीत कमी १६०००/- फी माफी द्यावी अशी सर्व कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनची मागणी आहे. सुमारे ३५ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थींची ही मागणी आहे.या संदर्भात मा.तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, दादासाहेब भुसे आदींना विविध स्तरातून पत्र, निवेदने देण्यात येत आहे. ट्वीटर वर सुध्दा #justiceforagristudent अशा प्रकारचा Trend सुरू आहे.कृषीप्रधान म्हणून घेणारया, देशात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? हे बघणे मह्त्वाचे ठरेल.
Related Posts