Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट : एकही मृत्यू नाही प्राप्त 3241 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 35 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 636 तर रॅपिड टेस्टमधील 2605 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3241 अहवाल निगेटीव्ह आहेत.

covide 19

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2,  बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, खामगांव शहर : 1, मोताळा तालुका : कोथळी 2, सिं. राजा तालुका : नागझरी 1, वाकड 1, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : टाकरखेड 1, जिगांव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सावरगांव 1, देऊळगांव 1, वझर 1,गोत्रा 1,कारेगांव 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, दे. राजा तालुका : भिवगन 3, जळगांव जामोद शहर : 2, चिखली तालुका : बेराळा 2,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 43 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 558132 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85675 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85675 आहे.

  आज रोजी 1409 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 558132 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86441 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85675 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 656 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.