Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्हा करोनमुक्त्तीच्या बातम्या ठरल्या फोल तर 55 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.14 :- सोशल मीडियावर अनेक ठिकाणी जिल्हा करोनमुक्त्तीच्या बातम्या पसरत असतांना बातम्या ठरल्या फोल तर 55 पॉझिटिव्ह . प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2118 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2063 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1305 तर रॅपिड टेस्टमधील 758 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2063 अहवाल निगेटीव्ह आहेत.

 पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : भडगांव 1,  मलकापूर तालुका : वाकोडी 1,    सिं. राजा तालुका : किनगांव राजा 2, कुंबेफळ 1,  संग्रामपूर तालुका : बोरखेड 1,    दे. राजा शहर : 2,   दे. राजा तालुका : नारायणखेड 1, पांगरी 1, पिंपळगांव चि 4, जांभोरा 2,     खामगांव शहर : 8, खामगांव तालुका : गोंधनापूर 1,    चिखली शहर : 3,  चिखली तालुका : अंबाशी 1, रस्तळ 1,  इसोली 1, सातगांव भुसारी 1,  शेगांव शहर : 3,  शेगांव तालुका : मनसगांव 3, गोळेगांव 1, जानोरी 1, पलोदी 1, भोनगांव 1, पळशी 1,  मेहकर तालुका : खामखेड 1,     जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1 ,   लोणार शहर : 2,  लोणार तालुका : येवती 1, आरडव 1, परजिल्हा चिंचबा ता रिसोड 1, जाफ्राबाद 2,  नागड ता. बाळापूर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा येथील 70 वर्षीय महिला, केसापूर ता. बुलडाणा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

  तसेच आज 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   
COVIDE 19

तसेच आजपर्यंत 531630 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85102 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85102 आहे.

आज रोजी 764 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 531630 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86008 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85102 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 257 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 649 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.