बुलडाणा दि.9 – : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4004 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 74 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 44 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 211 तर रॅपिड टेस्टमधील 3793 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4004 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :5, बुलडाणा तालुका : मोहज 1, पाडळी 1, रायपूर 1, दहीद 1, अजिसपूर 1, रूईखेड 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : सिराढोण 1, सिं. राजा शहर : 4, सिं. राजा तालुका : निमगांव 1, सुलजगाव 1, वर्दडी 1, सावरगांव 1, दुसरबीड 1, आडगांव राजा 1, दे. राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दे. मही 5, पिंपळगांव 1, खल्याळ गव्हाण 1, सावखेड तेजन 1, जुंबडा 1, जांभोरा 2, नागणगांव 3, सिनगांव जहागीर 2, पिंपळगांव चि 2, सावखेड नागरे 1, पिंप्री आंधळे 1, मेंडगांव 2, सातेगांव 1, सुरा 1, खैरव 1, चिखली शहर : 5, चिखली तालुका : भोरसा भोरसी 1, सावरखेड डुकरे 1, गोद्री 1, संग्रामपूर तालुका : शेवगा 3, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, जळगांव जामोद तालुका : पळशी सुपो 1, नांदुरा तालुका : दादगांव 1, लोणार तालुका : पिंप्री 1, शारा 1, जांभूळ 1, सरस्वती 1, धायफळ 1, सावरगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 74 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान माटरांव ता. शेगांव येथील 71 वर्षीय महिला, केळवद ता. चिखली येथील 80 वर्षीय महिला, मोहाडी ता. सिं. राजा येथील 85 वर्षीय महिला व शिवशंकर नगर, बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 138 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 514405 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84380 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84380 आहे.
आज रोजी 1399 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 514405 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85783 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84380 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 764 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 639 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.