बुलडाणा – दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3960 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3862 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 98 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 68 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 710 तर रॅपिड टेस्टमधील 3152 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3862 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :10, बुलडाणा तालुका : कोलवड 1, येळगांव 1, रायगांव 1, मासरूळ 1, दहीद 1, मोताळा शहर : 3,मोताळा तालुका : खामखेड 1, बोराखेडी 2, पुन्हई 1, रोहीणखेड 1, वडगांव 1, खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : जयपूर लांडे 2, गोंधनापूर 1, कदमापूर 1, शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : जानोरी 1, दे. राजा तालुका : चिंचखेड 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : अमडापूर 1, गोद्री 2, कोलारा 1, मुंगसरी 1, पिंपळवाडी 1, भोकर 1, पेठ 1, सातगांव भुसारी 2, रोहडा 1, कनारखेड 2, संग्रामपूर तालुका : शेवगा 3, अकोला बु 1, सवडद 2, मेहकर शहर :4, मेहकर तालुका : आंध्रुड 1, पेनटाकळी 4, दुर्गबोरी 1, मोहतखेड 1, हिवरखेड 1, जळगाव जामोद शहर :1, जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेलगांव मुकुंद 2, दादगांव 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : दे. कोळ 1, बाबुळखेड 1, शिवणी 1, ब्राम्हण चिकना 1, परजिल्हा पिंप्री डोळी ता. पातूर 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 98 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चांडोळ ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला व गुगळी ता. मोताळा येथील 72 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 129 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 510401 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84242 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84242 आहे.
आज रोजी 1062 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 510401 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85709 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84242 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 832 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 635 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.