कोवीड योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या मागणीसाठी जळगाव जा कोवीड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी दिले आ.डॉ कुटे यांना निवेदन…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – कोविड 19 च्या भयंकर महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर नर्स तसेच इतर कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 12 जून रोजी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना कोविड केअर सेंटर येथील कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
या भीषण महामारीमध्ये कोविड सेंटर मधील डॉक्टर नर्स व कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नव्हती तरी त्यांनी कोविड रुग्णांना सेवा दिली. तसेच या डॉक्टर नर्स व कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असताना जीवित हानी झाल्यास शासकीय नियमानुसार 50 लाख रुपये विमा कवच तसेच कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे असेही या कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे तसेच कोविड सेंटरमध्ये हे कर्मचारी मागील एक वर्षापासून सेवा देत असून ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती न करता याच कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना संधी देऊन कोविड केअर सेंटर जळगाव जामोद येथे त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी जळगाव जामोद येथील कोविड सेंटर मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवेदणाव्दारे केली आहे.सदर निवेदन देतेवेळी डॉ. निता पुंडे, डॉ. पवन सुरपाटणे,डॉ. शुभम पाटील, विष्णु गव्हाळे, आखरे,कांचन आखरे,मैना वक्टे,निता पाटील, ज्योत्स्ना पवार, दिपाली इंगळे,सुनिता गवई,शुभम गायकवाड, धम्मपाल सपकाळ, श्रीकृष्ण सोनोने, अमोल गवई,गौरव चोपडे, पायल निंबाळकर, शुभांगी गवई,पुनम गवई इत्यादींची उपस्थिती होती.गजानन सोनटक्के