सुनगाव येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून उपाययोजनांची गरज…
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रोजच्या रोज कोवीड रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण गावात फिरत आहे वाढत्या रुग्णसंख्येला ग्रामपंचायत प्रशासन तसेच सुनगाव येथील नागरीकांचा बेजबाबदार पणा कारणीभूत आहे. गावामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन होतांना दिसत नाही. तसेच नागरिक विना मास्क गावामध्ये फिरतात.तसेच सुनगाव येथे कोवीड तपासणी शिबीराला नागरीकांचा प्रतिसाद दिसुन येत नाही.त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे त्याचप्रमाणे कोवीड लसीकरण, कोवीड तपासणी करण्याकरिता का पुढाकार घेत नाहीत.गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात नागरीकांचे लसीकरण करणे तसेच कोवीड तपासणी केंद्रावर नागरिकांना घेऊन येणे.तसेच गावामध्ये कोरोना विषयी जनजागृती करणे,तसेच नागरिकांना तोंडाला मास्क लावायला प्रवृत्त करणे, विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करणे,तसेच वेळोवळी गाव सेनीटाईज करणे यामुळे गावाला कोरोनाच्या प्रादुर्भावापासुन वाचवता येते. तसेच पोलिसांनी सुद्धा गावामध्ये फिरून परीस्थिती चा आढावा घेणे गरजेचे आहे.त्यामुळे गावाला कोरोना महामारीपासुन वाचविता येते.