बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3569 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3559 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 24 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 684 तर रॅपिड टेस्टमधील 2875 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3559 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 3, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : पारखेड 2, सुटाळा 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 3, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, वाढोणा 1, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, किन्ही 2, मलकापूर तालुका : उमाळी 4, बुलडाणा शहर : 2, लोणार तालुका : पळसखेड 1, किनगांव जट्टू 1, देऊळगांव 1, रायगांव 1, भुमराळा 3, चिखली शहर : 2, चिखली तालुका : मुंगसरी 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, संग्रामपूर तालुका : बोडखा 1, मेहकर शहर : 1, परजिल्हा वाडेगांव ता. बाळापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 55 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 573780 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85934 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85934 आहे.आज रोजी 1723 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 573780 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86675 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85934 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 78 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.