Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोविडमुळे कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटूंबांना ‘स्माईल’ योजनेचा आधार

बुलडाणा दि.28 : जगात थैमान घालणाऱ्या कोविड 19 या साथरोगामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुंटूंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत (support for marginalized individuals for livelihoods enterprie) SMILE स्माईल ही योजना व्यवसायासाठी कर्ज देण्याकरीता अंमलात येत आहे. या योजनेनुसार प्रकल्प मुल्य 1 ते 5 लक्ष रूपये असल्यास कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी एनएसएफडीसी यांचा 80 टक्के सहभाग व 20 टक्के भांडवल अनुदान राहणार आहे. तसेच व्याजदर 6 टक्के असणारआहे.

COVIDE

  या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लक्ष रूपये पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. कुटूंब प्रमुखाच्या रेशन कार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकाकर आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र  यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे. तसेच मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड प्रत, उत्पन्नाचा दाखला (3 लक्षापर्यंत),  कोविड 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरवा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर भरण्यात यावी. तरी कोविडमुळे दुर्देवाने कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस धांडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.