बुलडाणा,दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2208 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2119 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 676 तर रॅपिड टेस्टमधील 1443 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2119 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :4, बुलडाणा तालुका : साखळी 2, सव 1, कोलवड 3, मासरूळ 1, दहीद खु 1, चांडोळ 1, सुंदरखेड 1, मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1, खामगांव शहर :1, खामगांव तालुका : पळशी बु 1, घाटपुरी 1, शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : शिरसगांव निळे 1, जानोरी 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका :2, टाकरखेड भा 4, बायगांव 2, दे. मही 2, अंभोरा 1, काळेगांव 1, तुळजापूर 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : खोर 1, शेलगांव 1, माळशेंबा 1, खैरव 1, संग्रामपूर तालुका : पलसोडा 1, धामणगांव 1, निवाणा 1, उमरा 1, बावनबीर 1, सगोडा 2, वसाडी 1,
सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, नसिराबाद 1, पिंपरखेड 1, सावखेड तेजन 1, मेहकर शहर :1 , मेहकर तालुका : जानेफळ 4, बरटाळा 1, बऱ्हाई 1, अंत्री देशमुख 2, चायगांव 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : जामोद 1, नांदुरा शहर : 5, नांदुरा तालुका : जिगांव 1, दादगांव 1, टाकरखेड 1, अंबोडा 1, लोणार शहर :1, लोणार तालुका : गुजखेड 1, सावरगांव मुंढे 1, शिंदी 1, किनगाव जट्टू 1, परजिल्हा अंदूरा ता. बाळापूर 1, दहीहांडा जि अकोला 1,तेल्हारा 1, केनवड ता. मालेगांव 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय पुरूष व काटोडा ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 193 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 506539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84113 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84113 आहे.
आज रोजी 942 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 506539 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85619 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84113 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 865 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 633 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.