जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन केली नागरिकांची तपासणी

गजानन सोनटक्के जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे वाढत्या कोरोना चे रुग्ण संख्या पाहता सुनगाव ग्रामपंचायत प्रशासन हे अलर्ट झाले आहे त्यानुसार सुनगाव जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तापमान तपासणी थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन लेवल ऑक्सिमिटर यंत्राच्या तपासणी केली व नागरिकांना आरोग्य संबंधी व स्वच्छते संबंधी नियम व उपाययोजना सांगितले व वेळोवेळी हात सानेटायझर ने धुवावे व आरोग्याची दक्षता घ्यावी व सकस आहार घ्यावा असे सांगण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा सूनगाव येथील शिक्षिका अस्मिता क्षीरसागर अंगणवाडीसेविका जोशी मॅडम भड मॅडम व आशा सेविका यांनी ही तपासणी केली