सिंदखेडराजा प्रतिनिधि (रवी ढवळे ) – सिंदखेडराजा शहर काँग्रेस च्या वतीने कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स नगरपालिकेने माफ करावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली .

मागील वर्षापासून करोना या वैश्विक महामारी मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत उघड्यावर आली आहेत लॉकडाउन मुळे अनेक लोकांची व्यवसाय, रोजगार बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज आहे आपल्या शहरांमधील एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा जर कोरोना या आजारामुळे मृत्यू झाला असेल त्या कुटुंबास एक वर्षाचा घरटॅक्स व नळ टॅक्स माफ करावा व त्यांना या काळात दिलासा द्यावा अश्या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी, नगरपरिषद सिंदखेडराजा यांना देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सिध्दार्थ जाधव, कार्याध्यक्ष उल्हास भुसारे, संजय चौधरी, अमोल ठाकरे, कदिर कुरेशी,शफी टेलर आदी काँग्रेस उपस्थित होते.