पेरणीच्या दिवसामध्ये लोक दिवसभर कामामध्ये असतात व रात्री थकून भागून झोपी जातात याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला परंतु घरमालकाला जाग आल्याने त्यांचा प्रयत्न फसला व चोर पळून गेले.
सविस्तर वृत्त असे की इसरुळ तालुका चिखली येथे दिनांक १८ जून २०२१ रोज शुक्रवार ला सकाळीं ३ ते ३:३० वाजेदरम्यान चोरट्यांनी किराणा दुकानदार रविंद्र दीडहाते यांच्या फॉरेस्ट ला लागून असलेल्या घराच्या मागच्या बाजूची भिंत दरवाजा शेजारी फोडली. त्या फोडलेल्या भिंतीच्या छिद्रातून हात घालत कडी उघडण्याचा प्रयत्न केला.

परंतू कडी ही फोडलेल्या जागेच्या विरुद्ध दिशेने असल्याने कडी पर्यंत हात पोहोचत नव्हता त्यामुळे त्यांनी आणखी भिंत फोडण्याचा प्रयत्न केला असता त्या आवाजाने रविंद्र दीडहाते जागे होऊन मागील खोलीमध्ये आले असता त्यांना भिंतीला छिद्र दिसले व त्यांनी आरडाओरड केली असता अंदाजे ३ ते ४ चोर आपले चोरीचे साहित्य जागेवरच सोडून पळून गेले. त्यामध्ये एक कुदळ ज्यावर कोरलेले “भगवान” असे नाव आहे. व दुसरे कडी उघडण्यासाठी आकड्याच्या तार हे सोडून पळून गेले. त्याच दिवशी गणेश भुतेकर यांच्या घराच्या दोन दरवाज्यांचे कोंडे तोडून किचन मध्ये प्रवेश केला परंतू समोरच्या कपाट असलेल्या रूम मध्ये सर्वजण झोपले असल्याने चोरट्यांनी किचन मधील काजू बदाम चे पाकीट घेऊन पसार झाले. ही घटना सकाळी उघडकीस आली. हे दोन्ही घरे फॉरेस्ट ला लागून आहे हे विशेष. इसरुळ येथे अशा चोरीच्या घटना पेरणीच्या दिवसांमध्ये मागील सलग ३-४ वर्षापासून होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी अंढेरा पोलीस प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व चोरांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. चोरीमध्ये जास्त प्रमाणात आर्थिक नुकसान न झाल्याने दोघांनीही पोलीस स्टेशनला अद्याप फिर्याद दिली नसल्याचे सांगितले.