बुलडाणा, दि. 3 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार मंडळाची फिरती अथवा तात्पुरती बैठक 4 डिसेंबर 2021 रोजी पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी संबंधीतांनी बैठकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोलकुमार अ. देशपांडे, प्रमुख दंडाधिकारी बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी केले आहे.